Maharashtra Politics । महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अद्यापही प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला होता. परंतु चार महिने होऊनही राहुल नार्वेकर यांनी याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. राहुल नार्वेकर यांच्या कामकाजांवर सुप्रीम न्यायालयाने नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत. त्यांना एका आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. (Latets Marathi News)
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाने राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “राहुल नार्वेकर निर्णय घेण्यास जाणूनबुजून उशीर करत आहेत. दुसऱ्या पक्षात जाणे म्हणजे विभाजन होत नाही, नार्वेकर असंवैधानिक सरकारला पाठिंबा देत आहेत, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
Ajit Pawar । “दंगलीसारख्या घटना कुणालाही परवडत नाहीत” – अजित पवार
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते क्लाईड क्रॅस्टो (Clyde Crasto) यांनीही टीका केली आहे, “राहुल नार्वेकर यांनी केलेल्या दिरंगाईवर आता प्रश्न उपस्थित करावेत. कारण सर्वोच्च न्यायालयानेही आमदारांच्या अपात्रतेच्या (Shivsena Crisis) याचिकेवर त्यांनी केलेल्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे नार्वेकरांनी लवकरात लवकर कारवाई करून निकाल द्यावा”, अशी मागणी क्रॅस्टो यांनी केली आहे.