प्रसिध्दी आणि पैसा पटकन दिसतो. मात्र त्यामागे फार मोठा संघर्ष असतो. काही माणसे आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीच्या व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करतात. अनेक अडथळे पार करत नाव कमवतात. दिव्या दत्त ( Divya Datt) ही अभिनेत्री यातीलच एक आहे. खूप मेहनतीने तिने अभिनय क्षेत्रात ( Acting career) स्वतःचे अस्तित्व तयार केले आहे. दरम्यान नुकत्याच एका कार्यक्रमात दिव्या दत्तने तिच्या आयुष्यातील एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला. Red Light Area
2005 साली दिव्या दत्त अॅमस्टरडॅममध्ये आयोजित आयफा पुरस्कार कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिची आई सुद्धा सोबत होती. हा कार्यक्रम संपल्यानंतर दिव्या तिच्या आईसोबत शहर पाहायला गेली. त्यावेळी हिंडत फिरत ती चुकून रेड लाईट एरियात ( Red Light Area) पोहोचली. त्या भागात फोटोग्राफीला बंदी आहे, हे तिला माहीत न्हवते.
त्यामुळे ती रस्त्यावर उभी राहून तिच्याआईसोबत फोटो काढू लागली. यामुळे तिथल्या वेश्याव्यवसायांनी दिव्या दत्तला घेरले होते. त्याठिकाणी काय करावे ? हे दिव्याला समजत न्हवते. यावेळी दिव्या दत्त आईला घेऊन घाबरून पळू लागली. तिथल्या वेश्या देखील तिच्या पाठी धावू लागल्या. शेवटी दिव्या कशीतरी आईसोबत तिथून निसटली. ही घटना आजही आठवली तरी दिव्याला भीती वाटते.
Sharad pawar | लवकरचं निर्णय होणार! शरद पवारांचे सूचक वक्तव्य; म्हणाले, “दोन दिवसांत…”