हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा त्याच्या हटके स्टाईल आणि अभिनयासाठी ओळखला जातो. ईदच्या शुभमुहूर्तावर बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खानने त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठ गिफ्ट दिल आहे. सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट २१ एप्रिलला रिलीज झाला आहे. दरम्यान नुकतीच सलमानने बहीण अर्पिता खानने आयोजित केलेल्या ईद पार्टीला हजेरी लावली. (Salman Khan’s movie ‘Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan’ has released on 21st April)
Ajinkya Rahane: एम एस धोनीने अजिंक्य रहाणेचे नशीब फिरवले, टिम इंडियाने घेतला मोठा निर्णय!
या पार्टीसाठी सलमानसोबतच बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. सध्या या पार्टीतील सलमानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सलमान खान त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत पहायला मिळत आहे. यामध्ये सलमान आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी यांच्यातील केमिस्ट्री सहज पहायला मिळतेय.
राजकीय वर्तुळात नवीन ट्विस्ट! मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत आणखी एका नवीन नेत्याची वाढ…
सलमान खान इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या सुपरस्टार पैकी एक असून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो चर्चेत येत असतो. सध्या देखील तो या व्हायरल व्हिडीओमुळे खूप चर्चेत आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडिओवर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. हिच्यासोबतच लग्न कर’, अशा कमेंट नेटकरी करत आहेत.