शेळी दूध (milk) देते हे सर्वांनाच माहीत आहे, पण तुम्ही कधी ऐकले किंवा पाहिले आहे का की बोकडही दूध देते. आता सध्या मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बुरहानपूरमध्ये एका गोट फार्मवर चार बोकड शेळ्यांसारखे दूध देत आहेत. ऐकून तुम्हालाच आश्चर्य वाटलं असेल, पण ही घटना खरी आहे. या अप्रतिम बोकडांना पाहण्यासाठी लोक लांबून लांबून येत आहेत.
धक्कादायक! दोन सख्ख्या चिमुरड्या भावंडांचा तळ्यात बुडून मृत्यू
लोक या बोकडासोबत सेल्फी घेत आहेत आणि सोशल मीडियावर याचे फोटो देखील शेअर करत आहेत. या बोकडाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दूध देणारे चारही बोकड वेगवेगळ्या जातीचे आहेत. हे बोकड जवळपास अडीच वर्षांपासून दूध देत आहेत.
येणार …येणार! कापसाला पण ‘अच्छे दिन येणार’; अगामी काळात दर वाढण्याची शक्यता
नेमकं कस आहे दूध?
या बोकडांचे दूध सामान्य दुधासारखे आहे. या दुधावर संशोधन सुरू असून, त्याचा अहवाल अजून आलेला नाही. साध्या याच चर्चा सगळीकडे होत आहे. लोक लांबून लांबून दूध देणाऱ्या बोकडांना पाहण्यासाठी येथ आहेत. या बोकडांमध्ये यामध्ये सर्वात महागडी बकरी हंसा प्रजातीची आहे, ज्याची किंमत जवळपास साडेतीन लाख रुपये आहे.
सावधान! पुण्यात झिका विषाणूचा शिरकाव; प्रशासनाकडून काळजी घेण्याच्या सूचना