Chandrayaan 3 Live Streaming । चांद्रयान-3 लँडिंग किती वाजता होईल? ‘या’ ठिकाणी पाहता येणार थेट प्रक्षेपण

At what time will the Chandrayaan-3 landing take place? Live broadcast available at 'this' location

Chandrayaan 3 Live Streaming । ‘चांद्रयान-३’ (Chandrayaan 3) हे आता चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले आहे. याच्या लँडिंगकडे (Chandrayaan 3 Landing) अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. चंद्रयान-3 पाठवण्यासाठी एलव्हीएम-3 लाँचरचा वापर करण्यात आला आहे. जर लँडर सॉफ्ट दक्षिण ध्रुवावर गेला तर भारत हा दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश बनेल. (Chandrayaan 3 Launch)

Rashmi Shukla । फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा!

चंद्रयान-3 च्या लँडिंगसाठी आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. “चांद्रयान-3 ने आतापर्यंतचा प्रवास पूर्ण केला असल्याने यापुढील टप्पाही यशस्वीपणे पूर्ण करेल, असा विश्वास इस्रोने व्यक्त केला आहे. तसेच इस्रोच्या माहितीनुसार, 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 06 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. याच थेट प्रक्षेपण केले जाईल. (Latest Marathi News)

Shiv Sena News । एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! शेकडो समर्थकांसह बडा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश

या ठिकाणी पाहता येणार लँडिंग

तुम्हाला सॉफ्ट लँडिंगचं थेट प्रसारण घरबसल्या इस्रोच्या वेबसाईटवर पाहता येणार आहे. इतकेच नाही तर इस्रोचे युट्यूब चॅनल, फेसबुक पेज आणि DD National TV चॅनलवर पाहता येणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटापासून हे प्रक्षेपण होईल. (Chandrayaan 3 Streaming)

Onion Rate । कांदा प्रश्नावरून सरकारचा मोठा निर्णय! प्रतिक्विंटल २४१० दराने होणार खरेदी

चांद्रयान 2 मोहिम

दरम्यान, चांद्रयान 2 ही मोहिम जुलै 2019 ला झाली होती, परंतु ऑगस्ट महिन्यात चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न सुरु असतानाच त्याच्यावरील नियंत्रण सुटले. वेग त्यामुळे चंद्रावर उतरणारे लॅडर हे चंद्राच्या जमिनीवर आदळळे होते. त्यामुळे आता या चांद्रयान-3 मोहिमेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

क्रिकेट विश्वावर शोककळा! वयाच्या 49व्या वर्षी प्रसिद्ध क्रिकेटपटूनं घेतला अखरेचा श्वास

Spread the love