Site icon e लोकहित | Marathi News

Atik Ahmed Murder: पत्रकार बनून आले, गोळ्या झाडल्या, जय श्री रामाचा गजर केला अन् सरेंडरही केलं

Atik Ahmed Murder: Came as a journalist, shot, shouted Jai Shri Rama and surrendered

माफिया अतिक अहमद आणि अशरफ (Mafia Atiq Ahmed and Ashraf) यांची प्रयागराजमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराज मेडिकल कॉलेजजवळ ही घटना घडली आहे. दोघांवर 10 पेक्षा जास्त गोळ्या झाडण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.

सर्वात मोठी बातमी! गँगस्टर अतिक अहमद आणि अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या

माहितीनुसार, गँगस्टर अतिक अहमद आणि अशरफ अहमद हे दोघे मघाचय एकही दिवसापासून पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी आणण्यात आलं होतं. यावेळी काही पत्रकार अतिकशी बोलत होते. पोलीस बंदोबस्त देखील कडक होता. मात्र त्याचवेळी मारेकऱ्यांनी पोलिसांच्या घेऱ्यात घुसून गोळीबार केला आणि माफिया अतिक अहमद आणि अशरफ यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

लग्न कधी करणार? मुलगी कशी पाहिजे? आदित्य ठाकरे हसत म्हणाले…

अतिक आणि त्याच्या भावाला मारणारे मारेकरी हे माध्यमकर्मी म्हणून घटनास्थळी आले होते. गळ्यात आयकार्ड देखील घातलं होतं. गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर जय श्रीरामचे नारे देत लगेचच सरेंडरही केलं.

लग्न कधी करणार? मुलगी कशी पाहिजे? आदित्य ठाकरे हसत म्हणाले…

दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावून संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तीन सदस्यीय चौकशी आयोग स्थापन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. याप्रकरणी तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पावसासंदर्भात मोठी बातमी! पुढील तीन-चार तास महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

Spread the love
Exit mobile version