अतिक अहमदकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती! कोण होणार या मालमत्तेचा वारस?

Atiq Ahmed has a wealth of crores of rupees! Who will inherit this property?

गँगस्टर होऊन राजकारणी बनलेला अतिक अहमद ( Atiq Ahmad) आणि त्याचा भाऊ अशरफ यांची प्रयागराजमध्ये हत्या झाली आहे. या दोघांनाही पॉइंट ब्लँक गोळी मारण्यात आली. दरम्यान गोळीबार करणाऱ्या लवलेश तिवारी, सनी आणि अरुण मौर्य यांना यूपी पोलिसांनी पकडले आहे. मात्र अतिक अहमदच्या हत्येनंतर त्याच्या मालमत्तेचा वारस कोण असेल ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Atiq Ahmad Property)

Urfi Javed: उर्फी जावेदने कॅमेऱ्यासमोर ओलांडल्या सर्व मर्यादा, नको तेच झालं शूट अन्… Video व्हायरल

अतिक अहमद यांनी २०१९ च्या निवडणूकीवेळी ( 2019 Election) प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीबद्दल सांगितले होते. अतिफ अहमदकडे २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. अतीफ अहमदच्या नावावर १८०,२०,३१५ व त्याच्या पत्नीच्या नावावर ८१,३२, ९४६ रुपयांची जंगम मालमत्ता होती. त्याच वेळी त्याच्या नावावर १९ कोटी रुपयांपेक्षा जास्त स्थावर मालमत्ता होती. यामध्ये जमीन, अनेक आलिशान राजवाडे आणि फार्म हाऊसचा समावेश होता.

शरद पवारांना धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली; माजी गृहमंत्र्यांच्या ‘या’ जवळच्या नेत्याने केले बंड

अतिक व त्याची पत्नी शाइस्ता यांना मोहम्मद उमर, मोहम्मद अली, असद अहमद , अहजान, आबान अशी पाच मुले आहेत. यातील अली अहमदने खंडणीच्या प्रकरणात गेल्या वर्षी जुलैमध्ये प्रयागराज येथील सत्र न्यायालयात आत्मसमर्पण केले होते. तसेच मोहम्मद अहजम आणि मोहम्मद आबान या दोन मुलांचा कोणालाही ठावठिकाणा माहीत नाही. याशिवाय ऑगस्ट २०२२ मध्ये सीबीआयसमोर आत्मसमर्पण मोहम्मद उमर देखील गायब आहे.

Airtel: एअरटेलची शांतीत क्रांती! लाँच केला स्वस्त प्लॅन, जिओची डोकेदुखी वाढली

अतिक अहमद यांच्या मृत्यूनंतर त्यांचे फक्त चार पुत्रच कोट्यवधींच्या मालमत्तेचे वारसदार असतील. परंतु त्यांची दोन अल्पवयीन मुले व पत्नी सध्या फरार आहेत. अतिक अहमदची पत्नी शाईस्ता सध्या त्याची सगळी मालमत्ता पाहत असल्याचे म्हंटले जात आहे.

Sharad Pawar:‘आता भाकरी फिरवण्याची वेळ आलीये’ शरद पवार यांचे मोठे वक्तव्य

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *