बीड: केज (Kej) येथे महिला तहसीलदारासोबत धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती वादातून केजच्या तहसीलदार आशा वाघ गायकवाड यांना पेटवून देण्याचा प्रयत्न झाला आहे. दरम्यान त्या जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार और आहेत.
वंचित बहुजन आघाडी व शिवसेना एकत्र येणार? प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्हॅलेंटाईन डे पर्यंत काहीही… “
शुक्रवारी ( दि.20) संजय गांधी निराधार योजना विभागाच्या नायब तहसीलदार आशा वाघ जेवण करण्यासाठी घरी आल्या होत्या. त्यानंतर घरातून जेवण करून तहसील कार्यालयाकडे (Tehsil Office) असताना चारचाकी गाडीतून काही लोक त्यांच्यासमोर आले. या लोकांनी आशा वाघ यांना रस्त्यात अडवून जळगाव जमिनीच्या काही हक्कसोडपत्रावर सही करण्यासाठी जबरदस्ती केली. या लोकांमध्ये आशा (Asha wagh) यांच्या वहिनी सुरेखा मधुकर वाघ व त्यांच्या माहेरच्या लोकांचा समावेश होता.
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू उमेश यादवची मित्राकडूनच लाखो रुपयांची फसवणूक; पोलिसांकडून तपास सुरु
यावेळी आशा वाघ यांनी त्यांच्या भावाविरुद्धची पोलिस केस मागे घ्यावी, यावरून देखील बाचाबाची झाली. दरम्यान या लोकांनी आशा यांच्या गळ्यात दोरीचा फास टाकून गळा आवळला. तसेच त्यांच्या अंगावर पेट्रोलसदृश पदार्थ टाकला आणि त्यांना पेटवून देण्यासाठी काडी पेटी काढली. यावेळी वाघ यांनी आरडाओरड करत बीड रोडवरील हॉटेल मधुबनच्या दिशेने पळाल्या. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
शिक्षकाकडून विद्यार्थ्यांला लाथा बुक्क्यांनी मारहाण; व्हिडीओ होतोय व्हायरल
याआधी सुद्धा जून २०२२ मध्ये केज तहसील कार्यालयात आशा वाघ यांचा सख्खा भाऊ मधुकर वाघ याने धारदार कोयत्याने त्यांच्यावर खुनी हल्ला केला होता. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी त्यांचा भाऊ मधुकर वाघ हा कारावासात आहे.
शेतकऱ्यांना लग्नासाठी मुलगी मिळणे मुश्किल; केंद्रीय मूल्य आयोगाच्या बैठकीत शेतकऱ्यांनी मांडली व्यथा