गॅस सिलेंडर (Gas cylinder) ग्राहकांना आता सतर्क (alert) रहावे लागणार आहे. कारण आता घरगुती एलपीजी (LPG Gas) ग्राहकांना नव्या नियमांनुसार एका घरगुती एलपीजी कनेक्शनवर वर्षभरात आता केवळ 15 सिलेंडर (15 cylinders) मिळणार आहेत. त्यापेक्षा एकही सिलेंडर जास्त मिळणार नाही. त्यामुळे ग्राहकांना आता सिलेंडर जपून वापरावा लागणार आहे. इतकंच नाही तर ग्राहकांना आता सिलेंडरचा एका महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे. ग्राहकाला एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलेंडर घेता योणार नाहीत. तर यापेक्षा जास्त सिलेंडरची गरज असल्यास ग्राहकांना अनुदान नसलेले सिलेंडर घ्यावे लागेल.
सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण; वाचा सविस्तर
आत्तापर्यंत घरगुती विनाअनुदानित कनेक्शन असलेल्या ग्राहकांना पाहिजे तेव्हा लागेल तेवढे सिलेंडर मिळत होते. पण आता नव्या नियमांनुसार यात बदल झाला आहे. आता नियमानुसार घरगुती एलपीजी ग्राहकांना वर्षभरात केवळ 15 सिलेंडरच मिळणार आहेत. अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरसाठी नोंदणी केलेल्यांना या दराने वर्षभरात फक्त 12 सिलेंडर मिळणार आहेत.
यावर्षी असे वाढवा तूर पिकाचे उत्पादन, वाचा सविस्तर..
तर, नवीन नियमांनुसार, रेशनिंग अंतर्गत असलेल्या एका गॅस कनेक्शनवर एका महिन्यात फक्त दोनच सिलेंडर मिळणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत ही संख्या एका वर्षात 15 पेक्षा जास्त सिलेंडर असू शकत नाही. जर एखाद्या ग्राहकाला गॅसचे जास्त पैसे द्यावे लागत असतील, तर त्याचा पुरावा देऊन ग्राहकाला तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. तरच त्या ग्राहकाला अतिरिक्त सिलेंडर मिळू शकतो.
Ramdas Kadam: “नासक्या डोक्यातून नासके विचार येतात…”, रामदास कदमांचा भास्कर जाधवांवर हल्लाबोल