Nana Patole Car Accident । ‘तो’ अपघात नाही, नाना पटोलेंना चिरडून मारण्याचा प्रयत्न; काँग्रेसचा खळबळजनक दावा

Nana Patole Car Accident

Nana Patole Car Accident । भंडाऱ्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. प्रचार करून माघारी येत असताना ट्रकने मागून जोरात धडक दिली. या अपघातात नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत. यावर आता काँग्रेसने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Nana Patole Accident)

Raj Thackeray । बिग ब्रेकिंग! राज ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम

“विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला. ही अतिशय गंभीर घटना आहे. त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का?” असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी ट्वीट करत विचारला आहे.

Nana Patole । मोठी बातमी! नाना पटोलेंच्या कारचा भीषण अपघात, गाडीचे मोठे नुकसान

नाना पटोले हे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचा प्रचार दौरा करून परतत होते. त्यावेळी ताफ्याला भरधाव आणि अनियंत्रित ट्रकने मागून जोरात धडक दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाना पटोले हे ज्या कारमध्ये बसले होते, त्यांच्या कारच्या मागच्या भागाचा चुराडा झाला आहे. सुदैवानं नाना पटोले आणि गाडीतील इतर कोणाला दुखापत झाली नाही.

Udayanraje Bhosale । आज संपणार साताऱ्याचा सस्पेन्स, भाजपकडून मिळणार उदयनराजेंना संधी?

Spread the love