औरंगाबाद: ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत औरंगाबाद केंद्रातून बजाज ऑटो कला व क्रीडा विभाग, औरंगाबाद या संस्थेच्या विसर्जन या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच लोकजागृती बहुउद्देशीय संस्था , शेकटा या संस्थेच्या अचानक या नाटकास द्वितीय पारितोषिक प्राप्त झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. तसेच या प्राथमिक फेरीत देवमुद्रा मुव्हमेंट स्कूल , औरंगाबाद या संस्थेच्या दर्दवाला हॅपिनेस या नाटकाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले असून प्रथम व द्वितीय पारितोषिक प्राप्त नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.
२१ रागांवरील चित्रपट गीतांचा सुरदरबार रंगला
१५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२२ या कालावधीत तापडिया नाट्यमंदिर , औरंगाबाद व यशवंतराव चव्हाण नाट्यगृह , बीड येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १८ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले होते . स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री . श्रीप्रकाश सप्रे , श्री . प्रकाश खोत आणि श्रीमती मिनीक्षी केंढे यांनी काम पाहिले . सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री . सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.
मोठी बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेची रक्कम परत करावी लागणार
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे औरंगाबाद केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे आहेत. दिग्दर्शन प्रथम पारितोषिक अशोक शिवणगी ( नाटक – विसर्जन ) , द्वितीय पारितोषिक अशोक बंडगर ( नाटक – अचानक ) , प्रकाश योजना प्रथम पारितोषिक धनंजय दाणे ( नाटक विसर्जन ) , द्वितीय पारितोषिक वैशाली जाधव ( नाटक दर्दवाला हॅपीनेस ) , नेपथ्य प्रथम पारितोषिक दिनेश पाटोळे ( नाटक- बिहाईन्ड दी कर्टन ) , द्वितीय पारितोषिक श्रावण कोळणूरकर ( नाटक – अचानक ) , रंगभूषा प्रथम पारितोषिक अशोक जाधव ( नाटक – विसर्जन ) , द्वितीय पारितोषिक सिद्धांत पाईकराव ( नाटक- बाजीराव नसतानी ) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक गजानन दांडगे ( नाटक – अचानक ) व वैष्णवी ठाकूर ( नाटक – विसर्जन ) , अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे पल्लवी गायकवाड ( नाटक – अचानक ) , आदिती खडकीकर ( नाटक – दर्दवाला हॅपिनेस ) , ऋचा कुलकर्णी ( नाटक – दोन स्पेशल ) , उराका कुलकर्णी ( नाटक – बिहाईड दी कर्टन ) , भारती कांबळे ( नाटक – अजुन उजाडत नाही ) , अशोक शिवणगी ( नाटक विसर्जन ) , सिध्दांत पाईकराव ( नाटक- बाजीराव नसतानी ) , सतीश साळुंके ( नाटक- बिहाइंड दी कटन ) , सुमित शर्मा ( नाटक – हेवान ) , प्रभाकर आंगळे ( नाटक – दुष्काळ )
कृषिपंपांच्या नवीन वीज जोडणी लवकरात लवकर उपलब्ध होणार; उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
(प्रतिनिधी – ज्ञानेश्वर ताले)