मुंबई : १ मे रोजी मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) औरंगाबाद (Aurangabad) मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेतली होती.दरम्यान या सभेसाठी दिलेल्या अटींचा भंग केल्याच्या आरोपात औरंगाबाद पोलिसांनी(police) नोटीस पाठवून आरोपपत्र दाखल करताना न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं आहे.या प्रकरणी राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटींचा भंग केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल होत असताना राज ठाकरेंनी उपस्थित रहावं, असं या नोटीसमध्ये (notice) सांगण्यात आलं आहे.
Shahid Kapoor: ‘या’ कारणामुळे शाहिद कपूर आणि मीराची रात्रभर भांडण होतात
औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंना स्पीड पोस्टने ही नोटीस पाठवली आहे. यावेळी औरंगाबादच्या डीसीपी उज्वला वनकर यांनी सांगितल की , “राज ठाकरे यांची औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा झाली होती. त्या अनुषंगाने एक गुन्हा दाखल आहे आणि त्याचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
Mumbai: आज मुंबईत पार पडणार मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची बैठक
त्यानुसार त्यांना ४१(१) ची नोटीस बजावण्यात आली आहे. आता कोर्टात आरोपपत्र दाखल होईल तेव्हा त्यांना तेथे हजर रहावं लागेल अशी माहिती वनकर यांनी दिली.ज्या गुन्ह्यांमध्ये सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा होते आणि आरोपीला अटक करणे आवश्यक नाही अशा प्रकरणात पोलीस ४१(१) नुसार नोटीस बजावतात अस देखील डीसीपी उज्वला वनकर म्हणाल्या.