मुंबई : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या २२ व्या आवृत्तीत भारताची कामगिरी सुरूच आहे. भारताने (India) आतापर्यंत 13 पदके जिंकली आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने पदक शतक पूर्ण केले आहे.
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आज सहावा दिवस आहे. आतापर्यंत 128 सुवर्णपदके निश्चित झाली आहेत. यापैकी 42 सुवर्णपदके ऑस्ट्रेलियाने जिंकली आहेत. सध्या या देशाने एकूण 106 पदके जिंकली आहेत. पदकांच्या या शतकासह ऑस्ट्रेलिया (Australia) पदकतालिकेत आघाडीवर आहे. यजमान इंग्लंड येथे दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडने आतापर्यंत 31 सुवर्णांसह एकूण 86 पदके जिंकली आहेत.
१00 किंवा त्याहून अधिक पदके जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत सर्वाधिक 42 सुवर्ण जिंकले आहेत. एवढेच नाही तर कांस्यपदकाच्या बाबतीतही संघ पहिल्या स्थानावर आहे. आतापर्यंत 32 ब्राँझ ऑस्ट्रेलियन संघाच्या कोर्टात आले आहेत. रौप्य पदकाच्या बाबतीतही संघ दुसऱ्या स्थानावर आहे. या हंगामात ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत 32 सिल्वर मेडल जिंकले आहेत.