घाटेअळीला वेळीच टाळा, अन्यथा हरभऱ्याचे होऊ शकते नुकसान; ‘असे’ करा उपाय

Avoid the caterpillars in time, otherwise the gram may be damaged; Do 'so' solution

हरभरा हे रब्बी हंगामात प्रामुख्याने घेतले जाणारे पीक आहे. सध्या राज्यात ढगाळ वातावरण असल्याने हरभरा ( Gram) पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अंधाऱ्यारात्री घाटेअळीचे पतंग मोठ्या प्रमाणात अंडी देतात. यागोष्टी घाटेअळीस पोषक असल्यामुळे हरभऱ्याचे नुकसान होऊ शकते. बऱ्याच ठिकाणी ही कीड दिसून आली आहे. एक घाटेअळी कमीत कमी तीस ते चाळीस घाटयांचे नुकसान करते. सध्या आढळणारी अळी ही प्राथमिक ( Primary Stage) स्वरूपात असल्यामुळे वेळीच उपाय केल्यास यावर नियंत्रण आणता येते.

पशुपालनाला महागाईचा झटका; उत्पादकांची चिंता वाढली …

घाटेअळी ही कीड ( insect) बहुभक्षी आहे. हरभऱ्याचे पीक फुलोरा किंवा घाटे अवस्थेत असताना ही कीड अधिक नुकसानकारक असते. या किडीचा लहान आळ्या सुरुवातीला कोवळी पाने व फुलांवर हल्ला करतात. तसेच घाटे लागल्यानंतर या अळ्या घाटे कुरतडून खातात. तसेच त्यात छिद्र पाडून डोके आत घालून दाणे खातात. या किडीवर नियंत्रण आणण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यासाठी प्राथमिक स्वरूपात पिकाची कोळपणी करुन पीक तणविरहित ठेवावे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे घाटेअळीच्या मोठ्या अळ्या हाताने वेचून त्या नष्ट कराव्यात.

सोयाबीन पासून गुलाबजाम बनवण्याचा अनोखा फंडा! शेतकऱ्यांनी लढवली अनोखी शक्यता

एकात्मिक व्यवस्थापन ( Management) करताना घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति हेक्टरी 5 कामगंध सापळे लावावेत. यांची उंची जमिनीपासून 1 मीटर इतकी असावी. या कामगंध सापळ्यांमध्ये प्रति सापळा 8 ते 10 पतंग सतत 2 ते 3 दिवस आढळल्यास किटकनाशकाची फवारणी करावी. यानंतर शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकापासून एक ते दोन फूट उंचीवर पक्षी थांबे उभे करावेत. हे पक्षीथांबे प्रति हेक्टरी ५० ते ६० ठिकाणी उभारावेत. पक्षी थांब्यांमुळे पक्ष्यांना अळ्यांचे भक्षण करणे सोपे जाईल. याशिवाय घाटेअळी च्या नियंत्रणासाठी फवारणी देखील अधिक परिणामकारक ठरू शकते.

बारामती शहरात विद्यार्थी सुरक्षित आहेत का? वाढत्या गुन्हेगारीमुळे ‘एज्युकेशन हब’ ला गालबोट!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *