Site icon e लोकहित | Marathi News

WhatsApp Multi Account Switch । भन्नाट फीचर! आता एकाच अ‍ॅपमध्ये वापरता येणार एकापेक्षा जास्त व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्स

Awesome feature! Multiple WhatsApp accounts can now be used in a single app

WhatsApp Multi Account Switch । सध्याच्या काळात जवळपास सर्वांकडे स्मार्टफोन आहे. त्यात सर्वांकडे व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) अकाउंट असतेच. विशेष म्हणजे फक्त तरुणवर्ग नाही तर सर्वच वयोगटातील व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत असतात. मेटाच्या मालकीचे असणारे व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवनवीन आणि शानदार फीचर्स (WhatsApp Features) घेऊन येत असते. (Latest marathi News)

Gadar 2 । बॉक्स ऑफिसवर ‘गदर २’ ची जादू, पहिल्याच दिवशी जमवला ‘इतका’ गल्ला

ज्याचा या वापरकर्त्यांना खूप फायदा होतो. अनेकांना दोन व्हॉट्सअ‍ॅपची गरज पडते. त्यामुळे ते बिझनेस व्हॉट्सअ‍ॅप (Business WhatsApp) किंवा क्लोन व्हॉट्सअ‍ॅप (Clone WhatsApp) वापरतात. जर तुम्हीही असे करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता व्हॉट्सअ‍ॅपने एक जबरदस्त फिचर आणले आहे. ज्यामुळे आता वापरकर्त्यांना फक्त एका अ‍ॅपमध्ये एकापेक्षा जास्त व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्स वापरता येणार आहेत.

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय! आता लॉटरी पद्धतीने नाही तर सर्व अर्जदारांना मिळणार शेततळे

असे करेल काम

याबाबत WABetaInfo या वेबसाईटवर माहिती दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आता आपल्या वापरकर्त्यांची समस्या लक्षात घेऊन मल्टी अकाउंट स्विच हे फीचर तयार केले आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर असणाऱ्या क्यूआर कोड बटणाच्या शेजारी एक नवीन आयकॉन दिले जाणार आहे. या आयकॉनवर क्लिक करताच तुम्हाला नवीन अकाउंट अ‍ॅड करता येणार आहे.

Asian Champions Trophy Semi Final । भारतीय संघ-जपानमध्ये होणार कडवी टक्कर, फायनलमध्ये कोणता संघ मारणार बाजी? जाणून घ्या

विशेष म्हणजे जोपर्यंत तुम्ही लॉगआऊट करत नाही, तोपर्यंत तुमच्या फोनमध्ये एकाच वेळी दोन अकाउंट अ‍ॅक्टिव्ह राहतील. हे नवीन फीचर काही बीटा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिले असून, लवकरच ते सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल.

Business Idea । शेतकऱ्यांनो बक्कळ कमाई करायची असेल तर सुरु करा ‘हा’ सुपरहिट व्यवसाय! सरकारही करेल मदत

Spread the love
Exit mobile version