Site icon e लोकहित | Marathi News

‘केरला क्राइम फाईल्स’ वेब सीरिजचा जबरदस्त टीझर रिलीज; ‘हे’ कलाकार प्रमुख भूमिकेत

Awesome Teaser Release of 'Kerala Crime Files' Web Series; The 'Hey' actor in the lead role

‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपट पाहण्यासाठी थेएटरमध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येने दिसत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटाला कडाडून विरोध केला जात आहे. राजकीय संघटनांकडून देखील या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. या दरम्यान आता केरळची आणखी एक स्टोरी सांगणार्‍या वेबसीरिजचा टीझर रिलीज झाला आहे.

सावधान! उन्हाळ्यात तुम्ही पण फ्रीजचं थंड पाणी पिताय? होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार; एकदा वाचाच

एका सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘द केरळ स्टोरी’ने सिनेसृष्टी पासून ते राजकारणापर्यंत खळबळ उडवून दिली आहे. अशातच ‘केरला क्राइम फाइल्स’ नावाची पहिली मल्याळम वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही वेबसीरिज डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ही वेबसीरिज मल्याळम, तेलगू, हिंदी, कन्नड बंगाली आणि मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर या वेबसीरिजची कथा एका मर्डर मिस्ट्रीमागील रहस्य उलगडण्या भोवती फिरताना दिसणार आहे. तर यामध्ये लाल आणि अजू वर्गीज हे मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत.

मोठी बातमी! विराटची पत्नी अनुष्का शर्माला भरावा लागणार हजारोंचा दंड

दरम्यान, या वेबसीरिजच्या टीझरमधून केरळमधील गुन्हेगारी विश्व, सेक्स वर्करची होणारी हत्या आणि त्यांचा तपास अशी एक सस्पेन्स थ्रिलर कथा अनुभवलेला मिळणार आहे. मात्र ही कथा सत्य घटनेवर आधारित नसल्याचं बोललं जात आहे. अशा परिस्थितीत या वेबसीरिजला ओटीटीवर कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे रंजक ठरेल.

ट्रेनमधून सर्वजण उतरत होते तेवढ्यात एका व्यक्तीची टॉयलेटकडे नजर गेली अन्… पुढील घटना वाचून येईल अंगावर काटा

Spread the love
Exit mobile version