त्र्यंबकेश्वर( Tryambakeshwar) येथे घडलेल्या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) आयोध्या दौऱ्यावर ( Ayodhya Tour) जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस अयोध्येला रवाना होतील. शिंदे-फडणवीस सरकारकडून या दौऱ्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान या दौऱ्यामध्ये नक्की काय होणार आहे ? तसेच कोणत्या कारणासाठी हा दौरा आयोजित करण्यात आलाय ? याबाबत कोणतीही सविस्तर माहिती अजूनही देण्यात आलेली नाही. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासोबत आयोध्या दौऱ्यावर गेले होते.
Gautami Patil | छोट्या पुढारीवर भडकली गौतमी पाटील; म्हणाली, “मी काय महाराष्ट्राचा…”
याचवेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडला होता. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या प्रसंगी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस दोघेसुद्धा महाराष्ट्रात न्हवते. यावरून त्यांच्या आयोध्या दौऱ्यावर भरपूर टीका करण्यात आली होती. मागील आयोध्या दौरा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिला वहिला आयोध्या दौरा होता. दरम्यान त्यांच्या अगामी दुसऱ्या आयोध्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
तुळजाभवानी मंदिरातील ड्रेस कोडवरुन अजित पवार संतापले; म्हणाले, “हाफ चड्डी घालू नका, असं…”