मागच्या काही दिवसापूर्वी एक महाराज गरम तव्यावर बसून मंत्र जप करत होता. याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. दरम्यान, सध्या देखील असेच एक बाबा चर्चेत आले आहेत. हे बाबा गरम तव्यावर नाही तर चक्क पाण्यावर तरंगत आहेत. सध्या याची सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा चालू आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती
पाण्यावर चक्क एक बाबा तरंगत असल्याचे दिसत आहे. हा सर्व प्रकार हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात घडला आहे. आणि आता चर्चा फक्त पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाची ऐकायला मिळत आहे. हिंगोलीतील धोत्रा गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. यासाठी ह.भ.प हरिभाऊ महाराज दुर्गसावंगीकर यांना कीर्तन करण्यासाठी बोलावलं आहे. मात्र हे बाबा रोज कीर्तनानंतर विहिरीत जाऊन पाण्यावर तरंगण्याचे प्रयोग लोकांना दाखवितात. त्यामुळे याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.
मोठी बातमी! माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक
त्या ठिकाणच्या भक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, हे बाबा पाण्यावर बारा-बारा तास तरंगत असतात. आणि ते पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे. वेद व ग्रंथ वाचनामुळे मला ही विद्या प्राप्त झाल्याचे हरिभाऊ महाराज (Haribhau Maharaj) सांगत आहेत.
“महिला स्कुटी चालवत होती मागे लागले भटके कुत्रे, अन् पुढे घडलं की…” पाहा थरकाप उडवणारा Video