Baba Maharaj Satarkar Passed Away । प्रसिद्ध कीर्तनकारह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. आज पहाटे सहा वाजता त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायी परंपरेतील व सातारकर फड परंपरेतील लाखो समुदायावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली ह. भ. प. भगवती महाराज व राजेश्वरी सोनकर आणि नातवंडे असा परिवार आहे. माहितीनुसार त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता नेरूळ या ठिकाणी अंत्यसंस्कार करतात करण्यात येणार आहे. वारकरी संप्रदायातील प्रमुख कीर्तनकार फड म्हणून सातारकर घराण्याच्या फडाचं नाव मानाने घेतलं जात असे. मागील चार पिढ्यांपासून सातारकर यांच्या घरात प्रवचन आणि कीर्तनाची परंपरा होती ही परंपरा बाबा महाराज सातारकर यांनी देखील मोठ्या अभिमानाने जपली आणि वाढवली होती. आता त्यांची कन्या ह. भ. प. भगवती महाराज ही परंपरा पुढे चालवत आहे. (Baba Maharaj Satarkar Passed Away)
Accident News । भीषण अपघात! ट्रक आणि कारची धडक, १२ जण जागीच ठार
एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली
त्यांच्या जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. राजकीय नेते देखील त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. “किर्तनकलेचा खऱ्या अर्थाने परिपूर्ण आविष्कार, असंख्य भाविकभक्तांचे श्रद्धास्थान, भागवत धर्माचा वैश्विक राजदूत आणि आधुनिक काळातील माउली महावैष्णव तसेच वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प.पू. गुरुवर्य श्री बाबा महाराज सातारकर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची अपरिमित हानी झाली आहे. परमेश्वर श्री बाबा महाराज सातारकर यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच त्यांचे कुटुंबातील सदस्य आणि भाविकभक्तगणांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.” असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्याचबरोबर सुप्रिया सुळे शरद पवार यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.
किर्तनकलेचा खऱ्या अर्थाने परिपूर्ण आविष्कार, असंख्य भाविकभक्तांचे श्रद्धास्थान, भागवत धर्माचा वैश्विक राजदूत आणि आधुनिक काळातील माउली महावैष्णव तसेच वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प.पू. गुरुवर्य श्री बाबा महाराज सातारकर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 26, 2023
त्यांच्या निधनाने… pic.twitter.com/DUSJtWXX1D
ज्येष्ठ निरुपणकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांची प्राणज्योत मालवली ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुःखदायक आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून त्यांची ख्याती होती.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 26, 2023
बाबा महाराज सातारकर यांचा आध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाचा वाटा मोलाचा होता.… pic.twitter.com/maWlRrMlCn
ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले. अतिशय सहज साध्या आणि रसाळ वाणीतून त्यांनी ज्ञानेश्वरी व संत साहित्याचे निरुपण केले. त्यांच्या निधनामुळे संतसाहित्याचे एक थोर अभ्यासक काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी… pic.twitter.com/LgrPbgwC9Z
— Supriya Sule (@supriya_sule) October 26, 2023