रामदेव बाबा सोशल मीडियावर कायम कोणत्या नाकोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. रामदेव बाबा म्हणाले होते, महिला साडी नेसल्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातल तरी त्या चांगल्या दिसतात. असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. आता पुन्हा एकदा रामदेव बाबा यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
प्रसिद्ध युट्युबर अरमान मलिकने केले तिसरे लग्न? पहिल्या दोन पत्नी आहेत गरोदर
रामदेव बाबा म्हणाले, इस्लाम म्हणजे नमाज अदा करणे आणि, जिहादी बनणे, हिंदू मुलींना उचलून नेणे, नमाज अदा केल्यानंतर हे सर्व शक्य आहे. असं वादग्रस्त विधान त्यांनी इस्लाम धर्माबाबत केले आहे. त्याचबरोबर त्यांनी ख्रिश्चन धर्माबाबत देखील वादग्रस्त विधान केलं आहे. ते राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील पन्नोनियो मधील ताला गावात एका धार्मिक सभेत बोलत होते.
मोठी बातमी! आदिल खानचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर; राखी ढसाढसा रडत म्हणाली…
ख्रिश्चन धर्माबद्दल बोलताना रामदेव बाबा म्हणाले, दिवसा चर्चमध्ये मेणबत्ती लावल्याने सर्व पाप धून जातात. हिंदू धर्मामध्ये हे केले जात नाही. ते म्हणाले, मी कोणावरही टीका करत नाही, मात्र, काही जण संपूर्ण जगाला इस्लाममध्ये धर्मांतरित करतायेत तर काहींना ते ख्रिश्चनमध्ये धर्मांतर करत असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. आता त्यांच्या या विधानामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी-बारावीच्या परीक्षेला बसता येणार नाही; बोर्डाने दिले आदेश