Baba Siddique Murder Case । ब्रेकिंग! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील तपासात मुंबई पोलिसांना मोठे यश; अजून एक जणाला घेतलं ताब्यात

Baba Siddique Murder Case

Baba Siddique Murder Case । राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा प्रकरणातील तपासात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. बाबा सिद्दीकी यांची गोळीबार करून हत्या करण्यात आली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हत्येच्या प्रकरणात, पोलिसांनी प्रवीण लोणकर नावाच्या संशयिताला पुण्यातून अटक केली आहे. प्रवीण लोणकर हा शुभम लोणकरचा भाऊ आहे, जो या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार मानला जात आहे.

Baba Siddiqui | बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार, स्थानिकांनी दोघांना पकडलं

पोलिसांच्या तपासानुसार, शुभम लोणकर आणि प्रवीण लोणकरने धर्मराज कश्यप आणि शिवानंद यांना हत्येसाठी निवडले होते. या दोघांना बाबा सिद्दीकींच्या हत्येचा भाग बनवण्याचा आदेश देण्यात आला होता. हत्येनंतर बिश्नोई गँगने या कृत्याची जबाबदारी स्वीकारली असून, शुभम लोणकरच्या सोशल मिडिया अकाउंटवर याबद्दलची पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये बिश्नोई गँगने इतरांना धमकी दिली होती की, जो कोणी सलमान खान आणि दाऊदच्या गँगची मदत करेल, त्याला वठविण्यात येईल.

Baba Siddique Dead | बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे बिश्नोई गँगचे कनेक्शन; धक्कादायक माहितीने उडाली खळबळ, पोलीस मास्टरमाईंडच्या शोधात

सध्या शुभम लोणकर फरार आहे, आणि पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. हत्येसाठी तयार केलेल्या भंगाराच्या दुकानाच्या परिसरात प्रवीण लोणकरचे दुकान असल्याने या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडताना आरोपींनी सहा गोळ्या झाडल्या, त्यात तीन गोळ्या त्यांच्या छातीत लागल्या. या प्रकरणातील तपासावरून पुढील माहिती लवकरच उघड होईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Baba Siddique Shot Dead | धक्कादायक! गोळीबारात राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू

Spread the love