Baba Siddiqui firing case । राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतील गुन्हे शाखेने आणखी एका आरोपीला लुधियानामध्ये अटक केली आहे. सुजित कुमार नावाचा हा आरोपी सासुरवाडीवर आलेला होता, आणि त्याला लुधियानाच्या भामिया कला परिसरातून अटक करण्यात आली. या घटनेत सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तिन्ही हल्लेखोरांपैकी एकाचे कनेक्शन सुजित कुमारशी जोडले गेले आहे.
सिद्धीक यांच्या हत्येसाठी योजना बनवणाऱ्या नितीनच्या बँक खात्यात सुजित कुमारने २५,००० रुपये पाठवले असल्याचा आरोप आहे. मुंबई आणि लुधियाना पोलीस यांची संयुक्त कारवाई या प्रकरणात महत्त्वाची ठरली आहे. माहितीप्रमाणे, सुजित हा मुंबईचा रहिवासी असून, नितीनच्या कनेक्शनद्वारे हत्येच्या योजनेत सामील झाल्याचे समोर आले आहे.
Eknath Shinde । ब्रेकिंग! एकनाथ शिंदेंवर बड्या नेत्याने केला मोठा आरोप; राजकारणात मोठी खळबळ
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपी राम कनौजिया याच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. सिद्दिकी यांची हत्या करण्याची सुपारी राम कनौजियाला दिली गेली होती, ज्याने एक कोटी रुपयांची मागणी केली होती. याशिवाय, अटक करण्यात आलेल्या एका आरोपीच्या मोबाईलमध्ये झिशान सिद्दिकी यांचा फोटो सापडला आहे, ज्यामुळे या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे.