Baba Siddiqui murder case । बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त कारवाईत रविवारी (१० नोव्हेंबर) उत्तर प्रदेशमधील नानपारा, बहराइच जिल्ह्यातून मुख्य शूटर शिवकुमार उर्फ शिवा गौतम याला अटक करण्यात आली. त्याने नेपाळमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले.
Bjp । सर्वात मोठी बातमी! निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सर्वात मोठा झटका
या कारवाईत शूटर शिवकुमारसह त्याच्या सहकाऱ्यांना, अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेशेंद्र प्रताप सिंग यांनाही अटक करण्यात आली आहे.१२ ऑक्टोबर २०२४ रोजी माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या करण्यात आली होती. हत्येची कारवाई लॉरेन्स बिश्नोई टोळीने केली होती, ज्यात शिवकुमार गौतम प्रमुख शूटर होता. हत्येच्या वेळी दोन शूटर धर्रामज आणि गुरमेल सिंग घटनास्थळी पकडले गेले होते, परंतु शिवकुमार फरार झाला होता.
शिवकुमारला आणि त्याच्या सहकाऱ्यांना पळून जाण्याची मदत करणारे इतर चार जण, अनुराग कश्यप आणि त्याचे सहकारी या गुन्ह्यात सामील होते. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एसटीएफची मदत मागितल्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली की, शिवकुमार बहराइचच्या नानपाडा गावात लपून बसलेला आहे. त्याला पकडण्यात आले आणि त्याने नेपाळमध्ये पळून जाण्याची तयारी केली होती.
Ajit pawar । सर्वात मोठी बातमी! बारामतीतील लढतीबाबत अजित पवारांचा मोठा दावा