Baba Siddiqui । बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात पोलिस चौकशीतून नवे धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. आरोपी धर्मराज कश्यप आणि गुरुनैल सिंग यांनी पोलिसांना सांगितले की, बाबा सिद्दिकी यांच्यासह त्यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दिकी यांनाही मारण्याचे आदेश बिश्नोई गँगकडून दिले गेले होते. 9 ऑक्टोबरच्या रात्री, झिशान कार्यालयातून बाहेर येत असताना फोन आला आणि तो पुन्हा कार्यालयात गेला, पण बाबा सिद्दिकी बाहेर निघाले होते आणि ते पार्क केलेल्या कारची वाट पाहात होते. त्याचवेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
याशिवाय, पोलिसांना मोहम्मद झिशान अख्तर या आणखी एका आरोपीचा शोध लागला आहे, जो बिश्नोई गँगचा सक्रीय सदस्य आहे. झिशान अख्तर आणि गुरुनैल सिंग या दोघांना हरियाणाच्या तुरुंगातून बाहेर पडल्यावर सिद्दिकींच्या हत्येची सुपारी मिळाली होती. हल्लेखोर मुंबईच्या कुर्ल्यात एकापेक्षा अधिक महिन्यांपूर्वी भाड्याच्या खोलीत राहात होते, जिथून त्यांनी हत्येची योजना तयार केली.
Maharashtra News l धक्कादायक बातमी! मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमात ‘लाडक्या बहिणीचा’ मृत्यू
बाबा सिद्दिकी यांना 15 दिवसांपूर्वी धमकी आली होती, ज्यामुळे त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. तरीही त्यांच्यावर हल्ला कसा झाला, याबाबत पोलिसांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात आणखी दोन आरोपी फरार आहेत, ज्यामध्ये मुख्य सूत्रधार मोहम्मद झिशान अख्तर आणि हल्ला करणारा शिवकुमार उर्फ शिवा गौतम याचा समावेश आहे. हत्येनंतर आता अभिनेता सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे, कारण त्यालाही यापूर्वी मारण्याची धमकी मिळालेली आहे. या घटनेने मुंबईतील राजकीय आणि चित्रपट क्षेत्रात चिंतेची लाट निर्माण केली आहे.
Festival Sale । दिवाळीत टाटा मोटर्सच्या गाड्यांवर मोठा डिस्काऊंट, संधी सोडू नका!