Baba Siddiqui । राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात भाजप नेते मोहित कंबोज यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मोहित कंबोज यांनी स्पष्ट केले की, दिवंगत बाबा सिद्दीकी हे त्यांचे 15 वर्षांपासून चांगले मित्र होते. बाबा सिद्दीकी हे एनडीएचे घटक होते आणि विविध राजकीय मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चाही होत होती. कंबोज यांनी सांगितले की, हत्येच्या घटनेनंतर त्यांना मोठा धक्का बसला होता आणि त्या कठीण काळात ते सिद्दीकी यांच्या कुटुंबासोबत होते.
Hiradgaon News । हिरडगाव ग्रामपंचायतचा कर दिल्याबद्दल चेअरमन बोत्रे पाटील यांचा येथोचीत सन्मान!
कंबोज यांनी झिशान सिद्दीकी यांच्या जबाबावरूनही प्रतिक्रिया दिली. त्यांचे म्हणणे आहे की, झिशान सिद्दीकी यांच्या स्टेटमेंटमध्ये त्यांचे नाव तोडून वापरण्याचा प्रयत्न केला जात आहे. कंबोज यांनी या प्रकरणात पोलिसांकडून सत्य बाहेर येण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. “जी घटना घडली ती धक्कादायक होती, आणि कारवाई योग्य पद्धतीने झाली पाहिजे,” असे कंबोज यांनी स्पष्ट केले.
Pune Accident News । पुण्यात हिंजवडीत भीषण अपघात, डंपरखाली दुचाकी आल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू
याशिवाय, कंबोज यांनी अजून एक महत्त्वाची बाब सांगितली आहे, की या हत्येमागे रिअल इस्टेटसंबंधी काही राजकीय आणि व्यावसायिक कारणे असू शकतात. त्यांनी पोलिसांवर विश्वास व्यक्त करत सांगितले की, सर्व सत्य बाहेर यायला हवे आणि न्याय मिळवला पाहिजे.