Site icon e लोकहित | Marathi News

Babanrao Pacchpute । शेतकऱ्यांसाठी आमदार बबनराव पाचपुते करणार उपोषण

MLA Babanrao Pachpute will go on hunger strike for farmers

Babanrao Pacchpute । सध्या राज्यभर पावसाने चांगली दडी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांची पिके सुकू लागली आहेत खरीप हंगाम वाया जाण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे बळीराजासमोर मोठे संकट उभा राहिले आहे. या परिस्थितीमध्ये आता ओव्हरफ्लोच्या पाण्याने धरण भरण्यात यावे घोड धरणात पाणी सोडण्यात दिरंगाई झाली तर आपण शेतकऱ्यांसह उपोषण करणार असल्याचा इशारा भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनी दिला आहे.

Crime News । त्याचा अपघातात मृत्यू झालाय असं सगळ्यांना वाटलं पण २ वर्षांनी चिमुरड्याने आणले आईचं घाणेरडं सत्य बाहेर

याबाबत आमदार पाचपुते यांनी प्रसिद्ध पत्र काढल आहे. या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कुकडी सल्लागार समितीचे अध्यक्ष यांना ना. चंद्रकांत पाटील यांच्याशी आपण संपर्कात आहोत. त्यामुळेघोड धरणामध्ये डिंभे धरणाचे ओव्हरफ्लोचे पाणी नदीमध्ये सोडण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे आमदार पाचपुते यांनी सांगितले आहे.

IMD Alert । पुढील महिन्याच्या सुरूवातीला पाऊस पडणार? जाणून घ्या पुणे हवामान खात्याचा अंदाज

त्याचबरोब बबनराव पाचपुते म्हणाले की, कुकडी धरणांमधून पाणी सोडावे यामुळे शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटेल आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. दरम्यान, ना. चंद्रकांत पाटील यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून दिनांक 31 ऑगस्ट रोजी कुकडी सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये वरील निर्णय अपेक्षित आहे जर हा निर्णय झाला नाही तर शेतकऱ्यांस उपोषण करणार अशी माहिती बबनराव पाचपुते यांनी दिली आहे.

Asia Cup 2023 । आशिया स्पर्धेपूर्वी रोहितचं मोठं विधान, म्हणाला; “पुढील दोन महिने…”

Spread the love
Exit mobile version