Babar Azam Captaincy Resign । पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, बाबर आझमने दिला कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा

Babar Azam Captaincy Resign

Babar Azam Captaincy Resign । विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. बाबर आझमने सोशल मीडियावर पोस्ट केली की, मी तिन्ही फॉरमॅटमधून पाकिस्तान संघाचे कर्णधारपद सोडत आहे. मात्र, फलंदाज म्हणून तो पाकिस्तानकडून खेळत राहणार आहे. त्याचवेळी बाबर आझमच्या राजीनाम्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शान मसूदला कसोटी क्रिकेटचा कर्णधार आणि शाहीन शाह आफ्रिदीला टी-20 क्रिकेटचा कर्णधार म्हणून घोषित केले आहे.

Havaman Andaj । 15 ते 25 नोव्हेंबरपर्यंत असे असणार महाराष्ट्राचे हवामान, पंजाबराव डख यांनी वर्तवला नवीन अंदाज

2023 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही पाकिस्तानला पोहोचता आले नाही. ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानला नऊ सामन्यांपैकी केवळ चार विजय आणि पाच पराभव पत्करावे लागले. पाकिस्तान आठ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. (Babar Azam Captaincy Resign )

बाबर आझम याने ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे, “गेल्या चार वर्षांत मी मैदानावर आणि मैदानाबाहेर अनेक चढ-उतारांचा सामना केला आहे, पण क्रिकेट जगतात पाकिस्तानचा आदर आणि अभिमान कायम ठेवण्यासाठी मी माझ्या सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले आहेत. सर्व व्हाईट बॉल फॉरमॅटमध्ये नंबर वन बनणे हे खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापन यांच्या मेहनतीचे फळ आहे, पण या प्रवासात पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो”

Success Story । भारीच! फुलशेतीनं चमकलं शेतकऱ्याचं नशीब, दरमहा कमावतोय 9 लाख रुपये

बाबर आझमने पुढे लिहिले की, ‘आज मी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून पाकिस्तानी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत आहे. हा एक कठीण निर्णय होता पण माझ्या मते योग्य वेळ आली आहे. एक खेळाडू म्हणून मी तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत राहीन आणि नवीन कर्णधाराला पूर्ण मेहनत आणि समर्पणाने साथ देईन. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि मला महत्त्वाची जबाबदारी दिल्याबद्दल मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आभारी आहे. पाकिस्तान चिरंजीव. असे ट्विट बाबर अझामी याने केले आहे.

Real Estate । खुशखबर! आता घरबसल्या दिसणार जमिनीचा नकाशा आणि सातबारा उताऱ्यासह रेडीरेकनरचे दर

दरम्यान, 2019 च्या विश्वचषकानंतर सरफराज अहमदच्या जागी बाबर आझमला कर्णधार बनवण्यात आले. विश्वचषक 2019 मध्ये पाकिस्तान ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला होता. या विश्वचषकात बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने नेदरलँड, श्रीलंका, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा पराभव केला. त्याचबरोबर भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. बाबर आझमने या विश्वचषकात नऊ सामन्यांत चार अर्धशतकांच्या मदतीने 332 धावा केल्या होत्या.

Fruit crop insurance । बागायतदारांसाठी आनंदाची बातमी! खात्यावर जमा झाली फळपीक विमा परताव्याची रक्कम

Spread the love