भारतातील तळागाळात जो शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार झाला आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी असलेला अशिक्षित समाज आता बऱ्यापैकी सुशिक्षित झालाय. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Aambedkar) यांचा सर्वात मोठा वाटा आहे. ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’. असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. आज त्यांचा महानिर्वाण दिन. यानिमित्ताने देशात विविध ठिकाणी लाखो कार्यक्रम पार पडले आहेत. देशातील नागरिकांनी आपल्या आपल्या परीने बाबासाहेबांना अनुवादन केले आहे. अशातच भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, नवी मुंबई येथील कलाशिक्षक नरेश मारुती लोहार यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.
“शरद पवारांना बेळगावाला जायची गरज पडणार नाही” – देवेंद्र फडणवीस
नरेश मारुती लोहार यांनी ज्वारीच्या भाकरीवर (Dr.Babasaheb Aambedkar’s Painting on Jowar Bhakari) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सहीसह चित्र काढले आहे. याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ‘जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या’ या बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन लोहार यांनी हे चित्र काढले आहे. 9 इंच व्यासाच्या भाकरीवर या कलाशिक्षकांनी हे चित्र काढले आहे.
“शरद पवारांनी पोलिसांकडून मार खाल्लेला पुरावा…”; नीलेश राणेंचे ट्विट चर्चेत
आपल्या कलेतून अनोखे अनुवादन करणाऱ्या लाहोर यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. याशिवाय दादरच्या चैत्यभूमी परिसरात देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भरपूर अनुयायी जमले होते. तसेच राज्य सरकार आणि मुंबई पालिकेने देखील महानिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर काटेकोर नियोजन केले आहे. सोबतच रेल्वेने देखील महापरिनिर्वाण दीना निमित्त विशेष लोकल सोडल्या आहेत.
जनावरांना मिळणार अवघ्या 300 रुपयांत विमा; वाचा सविस्तर माहिती