Site icon e लोकहित | Marathi News

Baby Care Hospital Fire । धक्कादायक घटना! बेबी केअर सेंटरला भीषण आग, 7 नवजात बाळांचा मृत्यू

Baby Care Hospital Fire

Baby Care Hospital Fire । देशाची राजधानी दिल्लीतील विवेक विहार येथील बेबी केअर हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीमुळे 7 मुलांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली अग्निशमन विभाग आणि स्थानिक लोकांना रुग्णालयातून 12 नवजात बालकांना बाहेर काढण्यात यश आले, मात्र त्यापैकी 7 जणांनी जग पाहण्याआधीच या जगाचा निरोप घेतला. पण त्या 7 नवजात मुलांचा काय दोष होता? त्याच्या आई-वडिलांचा काय दोष होता की त्यांना आता हे असह्य वेदना सहन करावे लागले? याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Cyclone Remal | आत्ताची सर्वात मोठी बातमी! 48 तासांत धडकणार ‘रेमल’ चक्रीवादळ

या भीषण आगीनंतर नवजात बालकाच्या कुटुंबीयांसह स्थानिक प्रशासनाला धक्का बसला आहे. दिल्ली अग्निशमन सेवा (डीएफएस) प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले की, विवेक विहारमधील ब्लॉक बी, आयआयटी जवळील बाल संगोपन केंद्रात आग लागल्याची माहिती मिळाली. गर्ग यांनी सांगितले की, “एकूण नऊ अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. बचाव कार्य सुरू आहे आणि आतापर्यंत 12 नवजात बालकांना वाचवण्यात यश आले आहे.”

Viral Video । अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत भर स्टेडियममध्ये घडला धक्कादायक प्रकार, पाहा व्हिडीओ

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री आग लागल्यानंतर अग्निशमन विभागाच्या पथकाने 12 मुलांची सुटका केली. या सर्व मुलांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान 7 मुलांचा मृत्यू झाला. पाच मुलांवर उपचार सुरू आहेत. माहिती देताना अग्निशमन संचालक म्हणाले की, 120 स्क्वेअर यार्डमध्ये बांधलेल्या ॲडव्हान्स केअर हॉस्पिटल बेबी केअर सेंटरमध्ये रात्री उशिरा आग लागली. सुमारे 16 वाहनांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

Sharad Pawar । शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का; युवा नेता सोडणार साथ

Spread the love
Exit mobile version