
Bacchu Kadu । आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तयारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) बुधवार, २७ मार्च रोजी उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपने महाराष्ट्रातील अमरावतीमधून नवनीत राणा यांना तिकीट दिले आहे. दरम्यान, भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवनीत राणा यांना बच्चू कडू यांनी कडाडून विरोध केला आहे.

Congress । लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का
याबाबत बोलताना बच्चू कडू यांनी गुवाहाटीबाबतही मोठा गौप्यस्फोट केला आहे. बच्चू कडू म्हणाले, “आज राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होण्यामागील सर्व प्लॅन हा गुवाहाटीमध्येच ठरला होता. यावेळी अजित पवार गटातील नेत्यांनी संताप व्यक्त केला होता. त्याचबरोबर गुवाहाटीला जाण्यासाठी आमदारांना खोके देण्यात आले, असा आरोप देखील तेव्हा महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला होता. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील समावेश होता.
Politics News । सातारच्या राजकारणातून समोर आली सर्वात मोठी बातमी
बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे यांनी मला दिव्यांग मंत्रालयाचा शब्द दिला म्हणून मी गुवाहाटीला गेलो होतो. बाकी माझ्या मनात काहीही नव्हतं, असा मोठा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे. दरम्यान रवी राणा अमरावती या ठिकाणाहून भाजपने उमेदवारी दिली आहे. मात्र बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
Raigad Lok Sabha । खासदार सुनील तटकरेंना धक्का; रायगड लोकसभेवर भाजपचा दावा