Maharashtra Politics । नवनीत राणांविरोधात बच्चू कडू मैदानात! लवकरच करणार उमेदवाराची घोषणा

Maharashtra Politics

Maharashtra Politics । अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha election) तोंडावर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेत. भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने (BJP) अनेकांना उमेदवारी नाकारल्याने नेतेमंडळी नाराज झाली आहेत. भाजपने नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बच्चू कडू नाराज झाले आहेत. (Latest marathi news)

Topers Ad

Crime News । धक्कादायक! बहिणीच्या प्रेमविवाहाला मदत केल्याचा राग अनावर, तरुणाला चिरडलं कारखाली

बच्चू कडू आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये बच्चू कडू (Bacchu Kadu) नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार घोषित करण्याची शक्यता आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी रवी राणा यांनी बच्चू कडूंवर (Bacchu Kadu vs Navneet Rana) आरोप केले होते. याचा वचपा बच्चू कडू आगामी निवडणुकीत काढू शकतात. याचा फटका भाजप आणि नवनीत राणा यांना बसू शकतो.

Mukhtar Ansari Dies । ब्रेकिंग! कुख्यात माफिया मुख्तार अन्सारी याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

अमरावतीमध्ये ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब (Dinesh Bub) हे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला आणि काँग्रेसने बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे दिनेश बूब नाराज झाले आहेत, अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता बच्चू कडू हे दिनेश बूब यांना प्रहारमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

IPL 2024 । ऋषभ पंतने ओलांडल्या सर्व सीमा, OUT होताच केलं नको ते कृत्य, सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ

Spread the love