बच्चन कुटुंब हिंदी सिनेमासृष्टीतील एक नावाजलेले कुटुंब आहे. या कुटुंबातील अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रॉय-बच्चन ही मंडळी कायम प्रसिद्धीच्या झोतात असतात. (Bachchan Family) दरम्यान, बच्चन कुटूंबियांची पुढची पिढी म्हणजेच अभिषेक बच्चन व ऐश्वर्या यांची कन्या आराध्या बच्चन ( Aaradhya Bachchan) सुद्धा तितकीच लोकप्रिय आहे. आता सुद्धा ती एका बातमीमुळे चर्चेत आली आहे.
राजकारणात लवकरच दोन मोठे भूकंप येणार; प्रकाश आंबेडकर आपल्या मतावर ठाम
मध्यंतरी आराध्या बच्चन विषयी एक चुकीची व खोटी बातमी व्हायरल झाली होती. ( Fake News) आराध्याचे आयुष्य व तिचे आरोग्य याविषयी ही बातमी होती. यामुळे आराध्या बाबत चुकीची माहिती पसरली गेली. या पार्श्वभूमीवर आता बच्चन कुटुंबीयांनी ठोस पाऊले उचलली असून खोटी बातमी पसरवनाऱ्या चॅनेल विरोधात कोर्टाचा दरवाजा वाजवला आहे. आराध्या विषयी चुकीची माहिती पसरवनाऱ्या चॅनेलवर कारवाई केली जावी. अशी मागणी त्यांनी केली आहे.
धक्कादायक! प्रसिद्ध गायक हनी सिंग वर मारहाण व किडनॅपिंगचा आरोप
आराध्या अल्पवयीन आहे. त्यामुळे ज्या युट्यूब चॅनेलने आराध्याच्या आरोग्य व आयुष्याविषयी चुकीची माहिती पसरवली आहे, त्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. व्हायरल होणारी बातमी थांबवावी. असं बच्चन कुटूंबाने कोर्टात दिलेल्या अर्जात म्हंटले आहे. दरम्यान आज (दि.20) दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश सी हरीशंकर यांच्यासमोर या प्रकरणावरील याचिकेची सुनावणी होणार आहे.
“…तर मला गुंड होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही”; सलमानचे वक्तव्य चर्चेत