
हिंदी चित्रपटसृष्टीतील बिग बी म्हजेच अमिताभ बच्चन यांचे फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रचंड चाहते आहेत. अमिताभ बच्चन व जया बच्चन या जेष्ठ जोडीबद्दल सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असतात. सध्या सोनी टीव्ही वरील कोण बनेगा करोडपती ( KBC) या कार्यक्रमाच्या 14 व्या पर्वात अमिताभ बच्चन हे सूत्रसंचालन करत आहेत.
शेतकऱ्यांनी घेतली थेट जलसमाधी; नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
केबीसी च्या सेटवर नुकत्याच झालेल्या एका भागात बिग बी अमिताभ बच्चन( Amitabh Bachchan) यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल एक नवीन माहिती दिली आहे. या नव्या भागाचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या भागामध्ये गुरुग्राममध्ये राहणाऱ्या रुची नावाच्या स्पर्धक हॉटसीटवर बसल्या होत्या. मीडिया अॅनलिस्ट म्हणून काम करणाऱ्या रुची यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अमिताभ बच्चन त्यांच्याशी गप्पा मारत आहेत.
आता ‘मागेल त्याला शेततळे मिळणार’; राज्य सरकारची मोठी घोषणा
गप्पा मारताना रुची यांनी “करवा चौथच्या सणाच्या दिवशी मी आणि माझ्या पतीने मिळून एकमेकांसाठी उपवास केला होता”, असे बिग बी यांना सांगितले. यावर बोलताना अमिताभ बच्चन यांनी एक मोठा खुलासा केला आहे. “लग्नानंतर सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये मीही जया ( Jaya Bachchan) यांच्यासाठी करवा चौथचा उपवास करायचो. मग पुढे हळूहळू ती सवय मोडली”, असे म्हणत यावेळी बच्चनसाहेबांनी त्यांच्या पत्नीप्रती प्रेम व्यक्त केले आहे. तसेच या भागात त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल आणखी आठवणी देखील सांगितल्या आहेत.
राजू शेट्टी यांचा सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले,” शेतकऱ्यांकडून लुटलेला पैसा राजकारणासाठी…”