राज्यात सध्या चालू असलेली राजकीय खळबळ आणि त्यातून एकमेकांवरती होणारे आरोप आणि प्रत्यारोप यांचा सडेमार चालू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बंड करून 40 आमदारांसोबत गुवाहाटीला गेले होते. या बंडा मध्ये प्रहार पक्षाचे आमदार आणि तत्कालीन मंत्री बच्चू कडू यांची देखील महत्त्वाची भूमिका होती.
सर्वात मोठी बातमी! नरेंद्र मोदी आणि CM योगींना जिवे मारण्याची धमकी
शिंदे गटात पदार्पण केल्यानंतर बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून त्यांनी वेळोवेळी आपली नाराजगी बोलून दाखवली. यातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी “बच्चू कडूंना आता मंत्रिपद मिळणार नाही” असा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. ते एका वृत्तवाहिनिशी बोलत होते.
शिव ठाकरेच्या चाहत्यांसाठी समोर आली आनंदाची बातमी!
रोहित पवार म्हणाले, “आता मंत्रिपद मिळणार नाही हे त्यांनाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला कळलंय” हे बोलताना त्यांनी शिंदे गटातील 40 आमदारांनाही मंत्रीपद हवंय तसंच भाजपच्याही अनेक नेत्यांना मंत्रिपद पाहिजे या गोष्टीवरती उलगडा केला. जर पाहिलं तर पाच आमदारांच्या मागे एक मंत्रिपदी येऊ शकतं त्यामुळे शिंदे गटात 12 किंवा 14 पर्यंत मंत्रिपदे मिळतील तर बाकीच्या 26 लोकांना काय मिळणार असं म्हणत त्यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली आहे.
राज्य सरकारने अवकाळी पावसाबाबत शेतकऱ्यांसाठी घेतला धडाकेबाज निर्णय!