Site icon e लोकहित | Marathi News

मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडू यांची मिश्किल प्रतिक्रिया; म्हणाले, “जेवल्याशिवाय आमंत्रण…”

Bachu Kadu's difficult reaction to cabinet expansion; Said, "Invitation without food..."

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू ( President of Prahar Jan Shakti Party Bachu Kadu ) यांनी महिनाअखेरपर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराची ( Cabinet expansion ) शक्यता असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सरकार स्थापन होऊन बराच कालावधी उलटला आहे परंतु तरीदेखील राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. परंतु आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.

धक्कादायक घटना! ताप येतं होता म्हणून तांत्रिकाला बोलावलं; अंगात भूत आहे म्हणून तरुणाला केले ठार

बच्चू कडू मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत म्हणाले, बसून जेवणाचं आमंत्रण जेवल्याशिवाय जेवणाचं काही खरं नसतं अशी प्रतिक्रिया दिली आहे. घोडा मैदानाजवळच आहे परंतु लढाई नाही. मंत्री झाले नाहीत परंतु तरीदेखील काम करतोय. व मंत्री झालो तर अधिक वेगाने कामे करेन. परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला हवा. विस्तार लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. व प्रत्येक जिल्ह्याला वेगळा पालकमंत्री ( Guardian Minister ) भेटणं देखील गरजेचे आहे. अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.

धक्कादायक! पत्नीला ९ वेगवेगळ्या पुरुषांसोबत संबंध ठेवायला लावले आणि नंतर…

भाजपतील सात आणि शिवसेनेतील सात जणांना शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. दरम्यान, अनिल बाबर, भरत गोगावले, संजय रायमुलकर, बच्चू कडू या चार नेत्यांची नवे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.

भारतासाठी अभिमानाचा क्षण! पुन्हा एकदा नीरज चोप्रा जागतिक भालाफेकपट्टू स्पर्धेत अव्वल

Spread the love
Exit mobile version