
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी २०१७ साली एका आंदोलनादरम्यान सरकारी कामांत अडथळा आणला होता. त्यामुळे त्यावेळी नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान आज यावर सुनावणी झाली असून आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
अजित पवारांना मोठा धक्का; अहमदनगर जिल्हा सहकारी बँक भाजपच्या ताब्यात
त्यामुळे आमदार बच्चू कडू यांना सरकारी कामात अडथळा आणणे चांगलेच भोवले आहे. त्याच झालं असं की, 2017 साली आमदार बच्चू कडू यांनी महापालिकेत आंदोलन केलं होते. या आंदोलनावेळी बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्तांवर हात उगारला होता. आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांना न्यायालयाने २ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. आता यावर आमदार बच्चू कडू यांनी दिली प्रतिक्रिया दिली आहे.
“आता स्त्रियांनी…”, महिला दिनानिमित्त राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत
बच्चू कडू म्हणाले, “दिव्यांग बांधवांनी नाशिक आयुक्त कार्यालयामध्ये २०१७ साली दोन आंदोलनं केली होती. यावेळी अपंग लोकांसाठी असलेल्या निधीचा खर्च होत नाही, त्यामुळे आंदोलन करणाऱ्या लोकांनी आम्हाला फोन केला. त्यामुळे मला फोन आल्यानंतर मी आयुक्तांना दोन पत्रं लिहिली. पण आमदाराच्या पत्रालाही आयुक्तांनी उत्तर दिलं नाही. त्यामुळे सामान्य माणसाचे अधिकार तर खड्ड्यात गेले. त्या आयुक्ताने कायद्याची ‘ऐशी की तैशी’ केली.” असल्याचं बच्चू कडू म्हणाले आहेत.
तुम्हाला सतत मोबाईल पाहण्याची सवय आहे का? असेल तर आताच बदला नाहीतर तुमचा ब्रेन…
दरम्यान, माहितीनुसार आमदार बच्चू कडू यांना 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्याव जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जातोय.