Site icon e लोकहित | Marathi News

अपघातांनंतर बच्चू कडू यांची कार्यकर्त्यांना विनंती; म्हणाले, “सर्वाना विनंती की कोणीही…”

Bachu Kadu's plea to activists after accidents; Said, "Request to all that no one..."

रास्ता ओलांडताना आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा अपघात झाला होता. हा अपघात अमरावतीमध्ये झाला आहे. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना अमरावतीच्या खासगी रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आता स्वतः बच्चू कडू यांनी एक ट्विट शेअर करत कार्यकर्त्यांना भेटायला कोणीही येऊ नका अशी विनंती केली आहे.

मोठी बातमी! अखेर राखी सावंत अडकली लग्नबंधनात? अचानक लग्न करण्यामागे काय असेल कारण?

बच्चू कडू यांनी ट्विट करत लिहिले की, “आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये”.

चित्रपटसृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे निधन

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदारांना एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. आमदार बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला इजा झाली आहे.

अपघातानंतर बच्चू कडू यांनी स्वतःच दिली तब्येतीबाबत माहिती; म्हणाले, “माझी प्रकृती ठीक असुन…”

Spread the love
Exit mobile version