बच्चू कडूंचा खळबळजनक दावा, म्हणाले “येत्या १५ दिवसांत…”

Bachu Kadu's sensational claim, said “In the next 15 days…”

शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Govt) स्थापन झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत आहेत. अशातच आमदार बच्चू कडू (Buchchu kadu) यांनी मोठ विधान केल आहे.

‘तारक मेहता..’ मालिकेच्या चाहत्यांसाठी खुशखबर! ‘हा’ अभिनेता घेणार टप्पूची जागा

आगामी काळात शिवसेनेचा ठाकरे गट (Thackeray Group) वगळता तब्बल 10 ते 15 आमदारांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रसह देशभरातील जनतेचं लक्ष आगामी घडामोडींकडे वेधल जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महेंद्रसिंग धोनी झाला शेतकरी, फोटो शेअर करत चाहत्यांना तिला धक्का!

तसेच, राज्यातील शिंदे गट-भाजपाचे सरकार कधीही कोसळू शकते, असा दावा ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी, काँग्रेसकडून केला जात आहे. तर दुसरीकडे 20 ते 25 आमदार जरी इकडचे तिकडे झाले तरी सरकार मजबुतीने पूर्ण काळ पूर्ण करेल, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.

सोनू सूदच्या कार्याला लोकांनी केला अनोख्या पद्धतीने सलाम म्हणाले,’तूच आमचा देव’

पक्षप्रवेश आणि न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांमुळे मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख नेहमी पुउ जात आहे. मात्र, पुढील 15 दिवसांत अधिवेशनाच्या आधी मोठ्या प्रमाणावर प्रक्षप्रवेश होईल, असे बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्याचवेळी काॅंग्रेसच्या नेते मंडळींनी प्रतिक्रिया देणे सुरू केले आहे.

“त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत चाळीस वार केले”; आदित्य ठाकरे कडाडले

दरम्यान, शिंदे -फडणवीस सरकार स्थापन होऊन आठ महिने उलटून गेली आहेत. पण अद्यापही दुसऱ्या टप्प्यातील विस्तार झालेला नाही. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांनी आजही नाराजी व्यक्त केली आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे विरोधकांकडूनही यावर टीका केली जात आहे.

आदिल खानला अटक झाल्यानंतर राखी सावंतच्या वकिलाने दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आदिलविरोधात एवढे पुरावे आहेत की…”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *