माळशिरस तालुक्यातील पिंपरी-मोरोची रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. जे.पी म्हेत्रे कंपनीच्या मुरूम वहातुकीमुळे पिंपरी-मोरोची रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहतूक सेवेवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.
क्रिकेट विश्वात सुरवात? लहान वयात वडिलांचे निधन; वाचा विराट कोहलीच्या जीवनातील काही किस्से
रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. रस्त्यावर जागजागी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावरील खडी उखडली आहे. रस्त्यावर वाहन चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज द्यायची – देवेंद्र फडणवीस
रस्त्याच्या या कामाकडे पिंपरी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. हा रास्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी तेथील स्थानिक नागरिक करत आहेत.
मोठी बातमी! कापुस-सोयाबीन भावासाठी राजू शेट्टी उभारणार आंदोलन
(प्रतिनिधी – सौरभ कर्चे)