Site icon e लोकहित | Marathi News

क्रिकेट प्रेमींसाठी समोर आली अतिशय वाईट बातमी! WTC फायनलपूर्वी टीम इंडियाला ICC चा सर्वात मोठा धक्का

ICC WTC Final 2023 : क्रिकेट प्रेमींसाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. ICC ने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship 2023) च्या अंतिम सामन्यापूर्वीच एक मोठा बदल केला आहे. आयसीसीने घेतलेला निर्णय टीम इंडिया साठी खूप घातक ठरू शकतो. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील ICC WTC मधील शेवटचा सामना होणार आहे. या सामन्याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे. दरम्यानच, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023चा शेवटचा मुकाबला India vs Australia यांच्यामध्ये 7 जून ते 11 जून यादरम्यान इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल (Canning ton Oval) मैदानावर होणार आहे.

ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसणार? पुण्यामध्ये चंद्रकांत पाटलांनी घेतली ठाकरे गटाच्या माजी आमदाराची भेट; चर्चांना उधाण

या महामुकाबल्यात खूप मोठा बदल केला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा शेवटचा मुकाबला ड्यूक्स बॉलने (Dukes ball) खेळला जाणार नाही. तर या सामन्याआधीच ICC ने असा निर्णय घेतला आहे. हा निर्णय टीम इंडियाला मोठा धक्का देणारा असू शकतो. या मुकाबल्याआधी ICC ने मोठा निर्णय घेतलाय. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा शेवटचा सामना ड्यूक बॉल ऐवजी कुकाबुरा बॉलने (Kuka Bura ball) खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने( Ricky Ponting) या निर्णयाला दुजोरा दिला आहे.

तुळजाभवानी मंदिरातील ड्रेस कोडवरुन अजित पवार संतापले; म्हणाले, “हाफ चड्डी घालू नका, असं…”

या निर्णयाबद्दल रिकी पॉंटिंग म्हणाला आहे की, आयसीसीने ड्यूक्सऐवजी कुकाबुरा चेंडू वापरण्यास संमती दिलीय. इंग्लंडमध्ये हे पहिल्यांदाच घडत आहे. त्यामुळे आता टीम इंडिया ड्यूक्स बॉलने कसोटी क्रिकेट खेळणार नाहीयाआधी भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा शेवटचा सामना खेळला गेला. तेव्हा मात्र ड्यूक्सबॉलचा वापर झाला होता. पण आता काही काळापासून ड्युक्स बॉलचा दर्जा घसरला आहे. अशी तक्रार येत होती. त्यामुळेच हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्वात मोठी बातमी! आदित्य ठाकरे राजीनामा द्यायला तयार, नेमकं काय आहे प्रकरण?

आयसीसी ने घेतलेल्या या मोठ्या निर्णयानंतर या बॉलच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे मालक दिलीप जाजोदिया (Dilip jaJoDiya) यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ (Indian express) ला माहिती दिली की, माझ्या माहितीनुसार गेल्या अनेक महिन्यांपासून चालू असलेल्या टॅनिंग प्रक्रियेमध्ये काही तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत . ही समस्या आम्ही दूर करू शकलो. कारण टॅनिंग आणि डाईंगची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. जर जास्त केमिकल वापरले गेले तर आणि डाई दुसऱ्या निर्मात्याकडून आली असेल तर, चेंडू बनवणाऱ्या कच्च्या मालावर या सर्व गोष्टींचा परिणाम होतो. त्यामुळे काही काळासाठी हा चेंडू पटकन त्याचा आकार बदलतो आणि स्विंग होत नाही. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.

घराचं खोदकाम चालू होतं, सापडला करोडो रुपयांचा मुघलकालीन खजिना, अन् मजूराने…

Spread the love
Exit mobile version