इंग्लंडमधील ओव्हलमध्ये येत्या 7 जून पासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळली जाणार आहे. या चॅम्पियनशिप 2023 साठी भारतीय संघाने के एस भरत (KS Bharat) आणि ईशान किशन (Ishan Kishan) या दोघांची देखील निवड केलेली आहे. ते दोघे देखील विकेट किपिंगची भूमिका बजावतात. दोन्हीही खेळाडू अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे दोघांपैकी कोणाला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळवायचं हा मोठा पेच टीम इंडिया पुढे उभा झाला आहे. क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांनी ईशान किशन कडे कौल दिला आहे. तर, काहीजण भरतला खेळण्याची संधी मिळावी असे मत व्यक्त करत आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या चार कसोटी सामन्यांमध्ये भरतने विकेट किपिंग केली आहे. त्यामुळे तो अनुभव आहे असं काहींच मत आहे.
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ तर, पेट कमिन्सच्या (Pet Commings) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया WTC ची गदा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी भारतीय संघ इंग्लंडला रवाना झालेला आहे. दरम्यान सराव करताना एका बड्या भारतीय खेळाडू गंभीर दुखापती झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
हनिमूनला गेलेल्या पती-पत्नीसोबत मध्यरात्री घडले भयानक! घटना वाचून बसेल धक्का
भारतीय संघातील आणि मुंबई इंडियन्सचा विकेट किपर ईशान शर्मा याला प्रॅक्टिस दरम्यान दुखापत झालेली आहे. बॅटिंग करताना ईशानला ही दुखापत झाली आहे. नेटमध्ये बॅटिंग करताना त्याच्या डाव्या हाताला चेंडू थेट लागला आणि त्यामुळे त्याला खूप वेदना झाल्या. या गंभीर दुखापतीमुळे ईशान किशन बाहेर होईल असे वाटत होते. परंतु ईशान किशन त्याच्या डाव्या हाताला पट्टी लावून खेळताना दिसला आहे. त्यामुळे आता संधी कोणाला मिळणार आहे याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मोठी बातमी! पुण्यामध्ये बैलगाडा शर्यती दरम्यान एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी