‘महिंद्रा थार’ ही गाडी अनेक लोकांसाठी स्वप्न आहे. महिंद्राच्या सर्वच गाड्यांना बाजारात प्रचंड मागणी आहे. मात्र थारचा एक वेगळाच स्वतंत्र फॅनबेस आहे. गेल्या काही महिन्यात या गाडीची लोकप्रियता प्रचंड वेगाने वाढली असून ती विकत घेण्यासाठीचा वेटिंग पिरियड देखील वाढला आहे. यामुळे ही गाडी विकत घेण्यासाठी सुद्धा लोक कित्येक दिवस वाट बघत असतात. दरम्यान महिंद्रा कंपनीने या गाडीबाबत एक महत्त्वाचा व मोठा निर्णय घेतला आहे.
भाजपविरोधात लढण्यासाठी महाआघाडीच्या हालचाली सुरु, शरद पवारांनी घेतली खर्गे आणि राहुल गांधींची भेट
या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने महिंद्रा थारच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या गाडीची किंमत तब्बल १ लाख ५ हजार रुपयांनी वाढली आहे. यामुळे थार विकत घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचा चांगलाच हिरमोड होणार आहे.
खडकवासलाचे पाणी येत नसल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल
महिंद्रा थारच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटच्या वेगवेगळ्या किंमती आहेत. महिंद्रा थार एक्स (o) हार्ड टॉप डिझेल एमटी आरडब्ल्यूडी व्हेरियंटची किंमत आता ५५ हजार रुपयांनी वाढली आहे. यासोबतच महिंद्रा थारच्या एलएक्स हार्ड टॉप डिझेल एमटी आरडब्ल्यूडी व्हेरियंटची किंमत १ लाख ५ हजार रुपयांनी वाढली आहे. या व्यतिरिक्त महिंद्रा थारच्या इतर व्हेरियंटच्या किमतीत फक्त २८ हजार रुपयांची वाढ झाली आहे.
आशा भोसले यांनी अमृता फडणवीसांना दिला महत्त्वाचा सल्ला; म्हणाल्या, “व्हॉइस मॉड्युलेशन व सराव…”
सध्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी एमिशन नियमांनुसार आपले मॉडेल्स अपडेट करत आहे. यामुळे थारसह इतर गाड्यांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महिंद्रा कंपनी लवकरच थारचं ( Mahindra Thar New varient) नवं व्हेरियंट लाँच करणार असल्याची शक्यता आहे.
ब्रेकिंग! शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या दिल्लीमधील बैठकीत घेण्यात आला सर्वात मोठा निर्णय