Bad Phone Charging Habits । सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत. स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अनेकजण दिवसातील बराच टाइम हा स्मार्टफोनवर घालवतात. काही जणांची कामे देखील स्मार्टफोनवर होतात. त्यामुळे आपल्याला सर्रास प्रत्येकाकडे स्मार्टफोन पाहायला मिळतो. स्मार्टफोनचा जास्त वापर केल्यामुळे त्याची बॅटरी देखील लवकर संपते त्यामुळे अनेकजण सतत मोबाईल चार्जिंगला लावतात. (Bad Phone Charging Habits)
मात्र तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने फोन चार्ज करत असाल तर तुम्हाला अनेक समस्या सामना करावा लागेल. मोबाईलमध्ये स्फोट होण्याचाही धोका आहे. फोन चार्ज करताना लोकांकडून बऱ्याचदा काही चुका होतात, त्यामुळे तुम्ही अशा चुका अजिबात करू नये. नेमक्या त्या चुका कोणत्या? त्या आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया..
लोकांमध्ये अशी सवय आहे की ते चार्जिंगवर फोन सोडतात. फोन चार्ज केल्यानंतरही चार्जर जोडून ठेवल्याने बॅटरी लवकर खराब होण्याचा धोका असतो. एवढेच नाही तर फोन चार्ज झाल्यावर लोक फोन बाहेर काढतात पण चार्जर प्लग इन करून ठेवतात. यामुळे चार्जरची कार्यक्षमता देखील बिघडू शकते. त्यामुळे फोन चार्ज केल्यानंतर तो बंद करा.
Sharad Pawar । राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रणाबाबत शरद पवार यांनी केले मोठे वक्तव्य
फोनमध्ये स्फोट होण्याची शक्यता
आजकाल अशा बऱ्याच कंपन्या आहेत ज्या स्मार्टफोन घेतल्यावर चार्जर देत नाहीत आपल्याला दुसरा चार्जर त्यासाठी खरेदी करावा लागतो. हे चार्जर थोडे महाग आहेत, त्यामुळे काही लोक स्थानिक चार्जर खरेदी करतात. पण असे करणे धोकादायक ठरू शकते, कारण फोनचा स्फोट होण्याचा धोका असतो. त्यामुळे नेहमी फक्त मूळ फोन चार्जर वापरावा.
मुलांना विजेचा धक्का लागू शकतो
बऱ्याचदा तुम्ही मोबाईल चार्जिंगचा काढल्यानंतर चार्जर तसाच ठेवतात मात्र अशावेळी घरातील लहान मुले चार्जरीची पिन चघळतात आणि जर आपल्याकडून चुकून स्वीच चालू राहिले तर मुलांना करंट बसण्याची देखील शक्यता असते.
Pune Fire News । सर्वात मोठी बातमी! पुण्यामध्ये एकाच वेळी 10 सिलेंडरचा झाला स्फोट