Badlapur Atrocities Case । बदलापुरातील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी अक्षय शिंदेला अटक केली होती. आता कल्याण न्यायालयाने आरोपीला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Breaking News । ब्रेकिंग न्युज! बदलापूर अत्याचार प्रकरणी महाराष्ट्र बंदची हाक
कल्याण न्यायालयातील न्यायाधीश वी ए पत्रावळे यांच्या दालनात झालेल्या सुनावणीत विशेष सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी आरोपीविरुद्ध युक्तिवाद केला. पोलिसांनी तपासाच्या दृष्टीने आरोपीची अधिक चौकशी करायची असल्याचे न्यायालयासमोर मांडले. यापूर्वी, 17 ऑगस्टला अटक करण्यात आलेल्या आरोपीला 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आता, तपासाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आरोपीची पोलीस कोठडी 24 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.
Thane Hit and Run Case । ठाण्यातील हिट अँड रनचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, अनेकांना कारने चिरडले
यावेळी न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बदलापूरकरांच्या तीव्र संतापामुळे आरोपीवर हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी स्टेशन परिसरासह न्यायालय परिसरात सुरक्षा वाढवली होती.
बदलापुरातील या प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांवर वेळेत कारवाई न केल्याचा आरोप होत आहे, तर शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच, तपासाच्या उशिरीमुळे तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात जलदगती न्यायालयात खटला चालवला जाणार आहे, ज्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा मिळण्याची अपेक्षा आहे.
Gautami Patil । मोठी बातमी! गौतमी पाटील अहमदनगर कोर्टात हजर, नेमकं प्रकरण काय?