Badlapur News । बदलापुरातील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी बदलापुर रेल्वे स्टेशनवर आंदोलन केलं आणि संपूर्ण दिवसभर रेल्वे सेवेला ठप्प केलं. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत त्यांचा रस्त्यावरचा विरोध संपवला. (Latest Marathi News )
या घटनेवरून सोशल मीडियावर खोटी माहिती आणि अफवा पसरवली जात असल्याच्या तक्रारी पोलिसांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ कारवाई केली. बदलापुरातील अल्पवयीन पीडितेच्या प्रकृतीविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार होऊन समाजात अशांतता पसरवल्याचा आरोप एका 21 वर्षीय तरुणीवर करण्यात आला आहे.
Breaking News । ब्रेकिंग न्युज! बदलापूर अत्याचार प्रकरणी महाराष्ट्र बंदची हाक
ही तरुणी अंबरनाथ येथील रहिवासी असून तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर साडेपाच लाख फॉलोअर्स आहेत. त्यामुळे तिच्या पोस्टची माहिती जलदगतीने पसरली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तरुणीला ताब्यात घेतले आहे. नागरिकांना अशा अफवा पसरवण्यास वाव देऊ नये आणि सोशल मीडियावर पसरवण्यात येणाऱ्या माहितीची खात्री करून घ्या, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.
Thane Hit and Run Case । ठाण्यातील हिट अँड रनचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, अनेकांना कारने चिरडले