दिल्ली : पी.व्ही.सिंधूने (P V. Sindhu) कॉमनवेल्थ गेमच्या अखेरच्या दिवशी भारताची अव्वल बॅडमिंटनपटू महिला सिंगल्समध्ये गोल्ड मेडल मिळवले आहे. तिने बॅडमिंटनच्या फायनलमध्ये कॅनडाच्या (Canada) मिचेल लीला 21-15, 21-13 असे सहज हरवत गोल्ड मेडल जिंकले. याचबरोबर सिंधूला पदक मिळायची ही पहिलीच वेळ नाही तिने याआधी देखील कॉमनवेल्थमध्ये तब्बल ५ पदके मिळवली आहे.
पी.व्ही.सिंधूने कॅनडाच्या मिचेल लीला अजिबात वरचढ होऊ दिले नाही. पहिला गेम २१-१५ असा आपल्या नावावर केला तर दुसरा गेम २१-१३ने जिंकला. पूर्ण सामन्यादरम्यान तिने पकड मजबूत ठेवली होती. दुसऱ्या गेममध्येही सिंधूने धमाकेदार खेळ खेळाला .
सिंधूने कॅनडाच्या खेळाडूचे अजिबात काहीच चालू दिले नाही. सिंधूने दुसरा गेम २१-१३ असा जिंकत गोल्ड मेडलला गवसणी घातली. आणि अखेर सिंधूने गोल्ड मेडल जिंकले आणि भारतासाठी नवीन इतिहास रचला.