
बागेश्वर बाबा सध्या चांगलेच चर्चेत आहेत. मोठ्या वादात अडकून देखील बागेश्वर बाबांकडे जाणाऱ्या भाविकांचा ओघ कमी झालेला नाही. मध्य प्रदेशातील छतरपूरमधील बागेश्वर धाममध्ये (Bageshwar Dham) मोठ्या संख्येने लोक गाऱ्हाने घेऊन पोहोचतात. त्यांच्या वक्तव्यांमुळे बागेश्वर बाबा सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. मागच्या काही दिवसापूर्वी बागेश्वर बाबा यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होत. दरम्यान, आता पुन्हा एकदा बागेश्वर बाबा यांनी शिर्डीच्या (Shirdi) साईबाबांविषयी (Sai Baba) वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
सर्वात मोठी बातमी! ‘या’ भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या
बागेश्वर बाबा यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना साईबाबांबद्दल भाष्य केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “आमच्या धर्मातील शंकराचार्यांनी साईबाबांना देवतांचे स्थान दिलेले नाही. कोणताही संत, मग तो गोस्वामी तुलसीदास जी असो वा सूरदास जी, तो संत, महापुरुष, युगपुरुष, मात्र तो देव नसतो. आता मी हे बोलल्यावर लोक यावरुन वाद घालतील,मात्र हे सांगणे देखील अत्यंत गरजेचे आहे की, कोल्ह्याची कातडी घालून कोणीही सिंह बनू शकत नाही,” असे वादग्रस्त वक्तव्य बागेश्वर बाबा यांनी केलं आहे.
खळबळजनक! पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला, जागीच झाला मृत्यू
त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, “साईबाबा हे संत किंवा फकीर असू शकतात मात्र देव असू शकत नाही. तिथे हिंदू पद्धतीने पूजा होत असली तरी कोल्ह्याची कातडी घालून कोणीही सिंह बनू शकत नाही. असं ते म्हणाले आहेत. सध्या त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा चालू आहे. त्याचबरोबर त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा वाढ वाढण्याची शक्यता आहे.
ब्रेकिंग! क्रिकेट विश्वावर शोककळा; भारताच्या माजी क्रिकेटपटूचे निधन