Bageshwar Baba Threat Case । बागेश्वरबाबा धमकीप्रकरणी समोर आली धक्कादायक माहिती

Bageshwar Baba Threat Case

Bageshwar Baba Threat Case । बागेश्वर बाबा सोशल मीडियावर कायम त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. बागेश्वर धामचे प्रमुख धरेंद्र शास्त्री यांना ई-मेलवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान त्यांना धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या छतपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी त्याला बिहारची राजधानी पटना या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे.

Viral । नवरी हार घालणारच होती मात्र नवरदेवाने केली आगळीवेगळी मागणी, ऐकून नातेवाईकांना बसला धक्का; पाहा Video

आरोपीने धमकीची कबुली दिली असून लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंध असल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बागेश्वर बाबा यांच्याकडे 30 ऑक्टोबरला दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. 30 ऑक्टोबर रोजी बागेश्वर धामच्या ईमेल आयडीवर बनावट ई-मेल आयडी वरून धमकीचा संदेश पाठवण्यात आला होता. (Bageshwar Baba Threat Case)

पहिल्यांदाच, iPhone 14 Plus इतका स्वस्त, 35 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा!

त्यानंतर पोलिसांची आणि तपास यंत्रणांची तारांबळ उडाली होती. त्यानंतर 22 ऑक्टोबर रोजी पुन्हा ई-मेल आयडीवरून धमकीचा ई-मेल आला होता. दरम्यान या प्रकरणाचा पोलीस तपास करत होते. तपासासाठी छतरपूरेच्या पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक देखील स्थापन करण्यात आले होते. या पथकामध्ये अनेक बड्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.

Nashik Bus Fire । आत्ताची सर्वात मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यात 25 प्रवाशांनी भरलेल्या धावत्या शिवशाही बसला भीषण आग, बस जळून खाक

Spread the love