नाशिक पदवीधर निवडणूकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याने तडकाफडकी निर्णय घेणे काँग्रेससाठी धक्कादायक होते. दरम्यान बाळासाहेब थोरात लवकरच काँग्रेसच्या एका अधिवेशनाला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
“सापाला वाचवायला गेला अन् तरुणासोबत घडलं असं की….” पाहा VIDEO
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ” मागील काही दिवसांपासून मी माध्यमांसमोर आलेलो नाही. मात्र माझा राजीनामा ही काँग्रेसची अंतर्गत बाब आहे. माध्यमांनी त्याला उगीच खूप मोठे केले आहे. आज मी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी मला काँग्रेसच्या (Congress) रायपूरमधील अधिवेशनाला यावे, असा आग्रह केला आहे. मी या अधिवेशनाला जाणार आहे.”
मोठी बातमी! महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराला सुरुवात
प्रत्येक संघटनेत काही न काही प्रश्न असतात. आमच्याही संघटनेत आहेत. माझे जे काही प्रश्न आहेत याबाबत मल्लिकार्जुव खरगे यांच्यासोबत चर्चा करावी. असे मत एच के पाटील यांनी व्यक्त केले आहे. हे सर्व प्रश्न काँग्रेसच्या बळकटीकरणासाठीच असून लवकरच त्यावर चर्चा केली जाणार आहे. असे देखील बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले. दरम्यान तुमची नाराजी दूर झाली का? असे विचारले असता थोरात यांनी उत्तर देण्याचे टाळले.
‘टॅटू दाखवण्यासाठी सगळा अट्टहास’ बोल्ड तपकिरी ड्रेसमध्ये दिसल्या मोहक अदा