पावसाने (Rain in Maharashtra) यावर्षी राज्यात उशिरा आगमन केले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून पावसाने पुणे (Pune), मुंबई (Mumbai), कोकण यांसह काही जिल्ह्यात चांगलीच हजेरी लावली आहे. या भागात पाऊसकाळ चांगला झाल्याने बळीराजा सुखावला असून ठिकठिकाणी पेरणीची तयारी सुरु आहे. परंतु राज्यातील काही भागात विदारक परिस्थती पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)
‘या’ पॅनकार्डधारकांना होणार फायदा! आयकर विभागाने दिला मोठा दिलासा
संपूर्ण जून महिना उलटला तरीही राज्यातील काही भागात पावसाने पाठ फिरवली आहे. त्याठिकाणचे शेतकरी पेरण्या रखडल्याने चिंतेत पडले आहेत. जर अशीच परिस्थिती काही दिवस राहिली तर शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडू शकते. परंतु बुलढाण्यातील (Buldhana) शेतकऱ्यांनी पाऊस पडावा, यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे.
पहाटेच्या शपथविधीबद्दल माहित होतं का? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” तेव्हा मला… “
बुलढाणा जिल्ह्यात पाऊस न पडल्याने पेरण्या रखडल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या आदिवासी बांधवानी कृत्रिम पाऊस (Artificial rain) पाडण्यासाठी शेताच्या बांधावरुन मिठाची धुरी सोडली आहे. याला धूळपेरणी म्हणजेच क्लाऊड सेडिंग (Cloud shedding) असेही म्हणतात. ज्या ठिकाणी आकाशात ढग जमले आहेत त्या ठिकाणी मिठाची धुरी दिली तर पाऊस पडतो, असा त्यांचा समज आहे.
त्वरा करा! वनप्लसच्या ‘या’ 5G फोनवर होईल 24 हजारांपेक्षा जास्त बचत, असा करा ऑर्डर
हे ही पहा